Monday 15 October 2012

Mumbai - Mahalaxmi Mandir

महालक्ष्मि  मंदिर  - मुंबई 


                  मुंबई मधील अतिशय प्रसिद्ध असे महलक्ष्मि मंदिर  भुलाभाई देसाई रोड , महलक्ष्मि इथे आहे. अतिशय प्राचीन अश्या ह्या मंदिराची स्थापना   १८३१ मधेय धाकजी दादाजी ह्यांनी  केली .
अशी एक आख्यायिका  आहे कि , १९१२ मधेय मुंबई चे गव्हर्नर होर्नबी ह्यांची समुद्राचे फानसिंग करण्यास सुरवात केली , परंतु हे काम पूर्ण होऊ शकले नाही , तेव्हाचे कंत्राटदार रामजी शिवाजी पाठारे ह्यांच्या स्वप्नांत देवी महलक्ष्मि आली आणि तिने सांगितले ; "समुद्रातील देवीची मूर्ती बाहेर काढ आणि देवळात तिची स्थापना कर "  , कंत्राटदाराने देवीच्या सांगण्या प्रमाणे केले आणि त्या नंतर त्यांचे अर्धवट राहिलेले कमीही पूर्ण झाले  .
       मंदिरात गाभार्यात महलक्ष्मि , महाकाली आणि महासरस्वती अश्या तीन देवीच्या मूर्ती आहेत . तीनही देवीच्या मूर्तींना अतिशय सुंदर असे सजवलेले आहे. नाकात नाथ , सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याचे दागिने अश्या अलंकारांनी सजवण्यात आलेले आहे.
      नवरात्र मध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव केला जातो  .
  

No comments:

Post a Comment