Thursday, 18 October 2012

Yogeshwari Devi - Ambejogai

योगेश्वरी देवी - अंबेजोगाई


                      श्री योगेश्वरी देवी चित्पावनांची कुलदेवता मराठवाड्यात कशी आली या विषयी एक कथा सांगितली जाते, श्री योगेश्वरी देवी , हे मुल कोकणचीच.  आडिवरे येथे देवीचे देवालय आहे. परळी वैजनाथ येथील देवाबरोबर देवीचे लग्न ठरले.  सर्व वऱ्हाडी  निघाले परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून नवरी रुसून बसली , लग्न मुहूर्त टाळून  गेला , तेव्हापासून देवी अविवाहित राहिली . दान्तासुर नावाच्या असुराला ठार केले म्हणून दंतासुर  असेही नाव पडले 
                   परंतु कोकणातील चित्पावनांची हे कुलदेवता कशी बनली अशी शंका निघते. या विषयी पौराणिक कथा आहे " अपरान्त " किंवा परशुरामाची भूमी म्हणूनही हा प्रांत ओळखला जातो . कोकण प्रांताची निर्मिती केल्यानंतर त्या प्रांतात शेती करण्यासाठी परशुरामांनी १४ गोत्रातून ६० कुटुंबे कोकणात नेली तसेच कोकणच्या समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत येऊन लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन  जिवंत केल्यानंतर त्यांच्याच बरोबर विवाह लावून देण्यासाठी परशुरामांनी अंबेजोगाई येथून वठू कोकणात नेल्या .
                    आपल्या मुलींची कोकणात पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांना एक अट  घातली कि , कोक्णार ज्या व्यक्तींबरोबर अंबेजोगाई नेलेल्या वधूचा विवाह होईईल त्या प्रत्येक कुळणी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे .
                  अंबेजोगाई चे मंदिर फार जुने आहे. जयंती नदीच्या काठावर पश्चिमेस साधारणपणे शहराच्या मध्यभागी देवीचे देवालय आहे , मंदिराचे शिखर कलापूर्ण आणि भव्य आहे. अनेक सुंदर शिल्पांनी देवालय सुशोभित केलेले आहे . मंदिराच्या गाभार्यात देवीची ओमकार स्वरूपी मूर्ती आहे. देवीची भव्य मूर्ती बघतच भाविकांची माने भारावून जातात .
            नवरात्रात देवीचा मोठा उत्सव होतो . नवमी अष्टमीला शतचंडीचे  पूर्णा हवन  होते. नवमीला महाभोग होतो. दसऱ्याला सुवासिनी खणा  नारळाने ओटी भरतात . संपूर्ण शहरातून देवीची पालखी निघते. मार्गाशिर्षातहि सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत देवीचा उत्सव होतो.
         

No comments:

Post a Comment